आज दिनांक 29 ऑक्टोबर 2022 रोजी लातूर प्रहारच्या वतीने प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चु कडू यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार रवी राणा यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी चौक लातूर येथे प्रहारच्या वतीने राणांच्या फोटोस जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. यावेळी जिल्हाप्रमुख राजाभाऊ चौगुले, चाकूर नगर पंचायत नगराध्यक्ष कपिल माखणे, युवक जिल्हाध्यक्ष शंकर दादा विटकर उपजिल्हाप्रमुख नितीन जाधव, विनोद तेलंगे, जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी जाधव, प्रहार अपंग क्रांती आंदोलन जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, शहर प्रमुख विश्वास कुलकर्णी असे संपूर्ण जिल्ह्यातील प्रहारसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
#BacchuKadu #Latur #RaviRana #PraharJanshakti #Andolan #Protest #Maharashtra #EknathShinde #DevendraFadnavis #BJP #HWNews